मुख्यमंत्री सातारा दौरा : खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुण्याला रवाना | पुढारी

मुख्यमंत्री सातारा दौरा : खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुण्याला रवाना

पुणे/सातारा : पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री सातारा दौरा : पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात त्यांना खराब हवमानाचा सामना करावा लागला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. मात्र, कमी दृश्यमानतेअभावी त्यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर उतरू शकले नाही. ते आता पुणे विमानतळाकडे परतले आहेत.

याबाबत सीएमओकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलेला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

मुख्यमंत्री सातारा दौरा : पाटण तालुक्यात मोठे नुकसान

तालुक्यातील अनेक गावात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यातील तीन गावात आतापर्यंत भूस्खलनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 जणांचे पार्थिव ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर येथे येऊन ते पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार होते. पुण्याहून हेलिकॉप्टरने ते कोयनानगरला रवाना झाले.

कोयनानगर येथे सकाळपासून अजून मधून पाऊस पडत आहे. त्वातावरण खराब असल्या मुळे त्यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. अखेर ते हेलिकॉप्टर पुण्याकडे वळवण्यात आले.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी साताऱ्यातील बैठकीत घेण्यात येणार आहे असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचलं का? 

Back to top button