वीर धरण : नीरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला, २१ हजार क्युसेक्सने विसर्ग | पुढारी

वीर धरण : नीरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला, २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

लोणंद : पुढारी वृतसेवा : सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरण क्षेत्रातून नीरा नदीत मोठया प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी रात्रीपासून सकाळपर्यत वीर धरण दरवाज्यातूल तीनवेळा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पहाटे ६ वाजता ५ दरवाजे ४ फुटाने उघडून २१ हजार ५०५ क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खोऱ्यातील धरणे वेगाने भरू लागली आहेत.

पूर नियंत्रण करण्यासाठी नीरा उजवा कालवा विभागाने आज मध्यरात्री साडेबारा वाजता वीर धरणातून नीरा नदीला ४ हजार ६३७ क्यूसेक्स पाणी सोडले आहे .

त्यात पहाटे २ वाजता वाढ करून १२ हजार ४०८ क्यूसेक्स करण्यात आला.मात्र पहाटे साडेपाच वाजता त्यात आणखी वाढ करून तो २१ हजार ५०५ क्यूसेक्स करण्यात आला आहे.

तसेच वीज निर्मितीसाठी ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

मागच्या ३ दिवसांत या धरणांवर आणि घाटमाथ्यावर ढगफुटी झाल्याने अभूतपूर्व अशा पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे वीर धरण ७१ टक्के भरले आहे.

नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

हे ही पाहा : 

Back to top button