Gokul milk : महापुराचा गोकुळला जबर फटका, पुरवठा ठप्प | पुढारी

Gokul milk : महापुराचा गोकुळला जबर फटका, पुरवठा ठप्प

कोल्हापूर (पुढारी वृत्तसेवा) : Gokul milk कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गोकुळ दुध संघाला याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील बहुतेक गावांचा संपर्क तुटल्याने Gokul milk संघाची वाहने अडकून पडल्याने लाखो लिटर दुधाचा पुरवठा ठप्प झाला आहे.

मागील दोन दिवसांत अनेक मार्गावरील दूध संकलनाची वाहने जाऊ शकली नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत २ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक दूध संकलन होऊ शकले नाही.

यामुळे दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जिल्ह्यात गेली तीन दिवस धुवाँधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दोनवेळच्या संकलनात ५० हजार लिटरची घट झाली होती.

तर, शुक्रवारी दोन्ही सत्रात २ लाख ५० हजारांवर संकलन ठप्प झाले आहे, असे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले.

दरम्यान महामार्गावर पाणी आल्याने बेळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या परिसरात दुधाचा पुरवठा होणार नाही.

याचबरोबर जिल्ह्यातील शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज या तालुक्याना दुधाचा पुरवठा होणार नाही.

दरम्यान आज दिवसभरात काही भागात पुर परिस्थीती ओसरल्यास दुध संकलन आणि विक्रीस वाहने जाणार असल्याचे गोकुळ दुध संघाकडून सांगण्यात आले.

मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांसाठी याचा मोठा फटका बसणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.

आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती दिली आहे.

Back to top button