बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे अलमट्टी धरणातून आज दुपारपासून 1 लाख 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
या धरणामध्ये सध्या 1 लाख 6 हजार 384 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
अलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123.081 टीएमसी इतके असून, आज शुक्रवारी या धरणात 91.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 212.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व भाटणवाडी. कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज, मांडूकली, सांगशी व कातळी. धामणी नदीवरील- पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदीवरील- सिद्धनेर्ली, सुळकुड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे. वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी, शेणगाव, शेळोली, कडगाव, सुक्याची वाडी, तांबाळे, अनप, दासेवाडी, पाटगाव व वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, देवर्डे, दाभीळ, हजगोळी, जरळी, हरळी भादवण, गजरगाव व करपेवाडी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, पिळणी, बिजूर भोगाली, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, हजगोळनाला व ढोलगरवाडी , चित्री नदीवरील- कारपेवाडी, चिकोत्रा नदीवरील- कासारी, वडगांव, अर्जुनवाडा, मेतके, गलगले, नंद्याळ व बेळुंकी असे एकूण 116 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 82.98 दलघमी, वारणा 930.63 दलघमी, दूधगंगा 515.26 दलघमी, कासारी 65.97 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 65.27 दलघमी, पाटगाव 89.27 दलघमी, चिकोत्रा 37.37 दलघमी, चित्री 53.41 दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी 25.07 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 30.98, कोदे (ल.पा) पूर्ण क्षमतेने भरला आहे.