

कराड : पुढारी वृत्तसेवा : koyana dam rain मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसांत कोयना धरण क्षेत्रात जवळपास ३६ टीएमसी पाण्याची आवक झाली. कोयना धरण परिक्षेत्रातील पाणीसाठा शनिवारी सकाळी ८७ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, मुसळधार पाऊस व कोयना धरणासह कृष्णा तसेच अन्य नदीवरील धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा कोयनासह सर्वच नद्यांना महापूर आला आहे.
koyana dam rain शनिवारी सकाळी सात वाजता कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे.
धरणाचे ६ वक्र दरवाजे बारा फुटांवरून ११ फूट ६ इंचपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणी पातळीत रात्रीच्या तुलनेत सकाळी हळूहळू घट होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
मागील चार दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर नवजा कोयना या संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
मंगळवारी सकाळी कोयना धरणात सुमारे ५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
मात्र त्यानंतर झपाट्याने पाणी साठा वाढला असून शनिवारी सकाळी सात वाजता धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसी इतका झाला होता.
मुसळधार पावसाने शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले होते.
मात्र पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे धरणात येणारे पाणी यामुळे दिवसभरात टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उचलण्यात येऊन सायंकाळी ते दरवाजे बारा फुटावर स्थिर ठेवण्यात आले.
धरणातून पाणी सोडले जात असतानाच सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळेच शुक्रवार दुपारपासून कोयना आणि कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे पहावयास मिळत होते.
मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोयना धरणात प्रतिसेकंद ९५ हजार ७२३ क्युसेक पाणी येत होते.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने धरणाचे दरवाजे त्यावेळी सहा इंचाने कमी करण्यात आले होते.
मध्यरात्रीपासून शनिवार सकाळपर्यंत कोयना धरणाचे दरवाजे ११ फूट ६ इंचावर स्थिर ठेवण्यात आले आहे.
त्याचवेळी मध्यरात्रीच्या तुलनेत शनिवारी सकाळी कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
शनिवारी सकाळी सात वाजता १३ हजार ५३६ क्युसेक पाण्याची आवक होत होती.
सकाळी सहा ते सात या एक तासाच्या कालावधीतील ही आवक आहे.
कोयना नदीच्या कृष्णा नदी काठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला असून आता पावसाने विश्रांती घ्यावी, अशी प्रार्थना कृष्णा व कोयना नदीकाठच्या गावातील लोकांकडून केली जात आहे.
हे ही वाचा :
[visual_portfolio id="6394"]