ढगफुटीचा पाऊस नेमका पडतो कसा? ढगफुटी नेमकी होते कशी | पुढारी

ढगफुटीचा पाऊस नेमका पडतो कसा? ढगफुटी नेमकी होते कशी

पुढारी ऑनलाईन डेस्क:  गेल्या आठवड्यापासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने आता रौद्ररुप धारण केले आहे. गुरुवारी राज्यात तब्बल १३ ठिकाणी ढगफुटी झाली आहे.  चिपळुणात गेल्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे.

अधिक वाचा

उत्तरेकडील हिमालयांच्या रागांमध्ये होणारी ही ढगफुटी आता पश्चिम महाराष्ट्रात होत आहे. ही ढगफुटी नेमकी होते कशी ते जाणून घेऊ.

एरवी पाऊस पडत असला की लगेच गटारी, ओढे, नाले, नद्यांना पाणी येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया होत असते.

अधिक वाचा

हे पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबली की पाणी वाहू लागते. मात्र, ढगफुटी झाल्यानंतर काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

शिवाय त्या पाण्याच्या थेंबांचा वेग इतका प्रचंड असतो की, जमिनीला पाणी शोषून घेण्यास वेळच मिळत नाही.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात अचानक पूर येतो आणि नुकसान होते.

अधिक वाचा

नेमकी काय होते प्रक्रिया

पावसाळ्यात पाण्याने भरलेले ढग वाऱ्याबरोबर वाहून जात असतात. गरम हवा आणि आर्द्रता यामुळे ढगात पाण्याचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे मोठा पाऊस पडतो.

मात्र, वाऱ्यामुळे या ढगात पोकळी निर्माण होते आणि भोवरा हा ढग वेगाने वर घेऊन जातो. मोठा गोल खांब जणू हा पाण्याने भरलेला ढग आपल्या वेगाने वर-वर नेतो. या प्रक्रियेमुळे पाण्याचे थेंब टपोरे आणि मोठे होतात.

वेगाने वर जाणाऱ्या ढगात वावटळ निर्माण होते आणि त्यात पाण्याचे थेंब येतात. या हवेच्या खांबाची ताकद जितकी असेल तेवढा तो ढग वर जातो आणि एका टप्प्यावर गप्पकण थांबतो.

त्यानंतर हा ढग प्रचंड वेगाने जमिनीकडे झेपवतो. सुरुवातील ताशी १२ किलोमीटरचा वेग ८० ते ९० किलोमीटरमध्ये परिवर्तित होतो.

अधिक वाचा

एकाच वेळी मारा

वरून वेगाने येणारे हे पावसाचे थेंब जमिनीवर प्रचंड मोठा मारा करतात. एरवी पडणाऱ्या पावसाच्या थेंबापेक्षा हे कितीतरी पटीने जास्त वेगवान असतात.

हा ढग जमिनीच्या एका लहानशा भूभागावर पडतो आणि त्याचा मारा इतका वेगवान असतो की, पाणी शोषूण घेण्यास वेळ मिळत नाही. या माऱ्यात अनेक झाडे, घरे जमीनदोस्त होऊ शकतात.

तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याचा प्रचंड मोठा लोट वाट मिळेल तिकडे वाहू लागतो, या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट ते उद्ध्वस्थ करते.

अधिक वाचा

ढगफुटीच्या पावसात अनेक प्राणीही मृत्यूमुखी पडतात. भारतात ६ ऑगस्ट, २०१० रोजी लेहमध्ये एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस पडला होता.

तसेच हिमाचल प्रदेशातील बरोट, २६ नोव्हेंबर, १९७० एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस पडला होता. अशा देशभरात अनेक नोंद न झालेल्या ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत.

२६ जुलै, २००५ रोजी मुंबईत अशा प्रकारे ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. २०१३ मध्ये उत्तरकाशीमध्येही ढगफुटीमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते.

याबाबत ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागातील तांत्रिक अधिकारी डॉ. मयूर सुतार म्हणाले,‘एका तासात १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला ढगफुटी म्हणतो.

कोल्हापूर,सांगली, सातारा या परिसरात ढगफुटी झालेली नाही. वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात ढगफुटी होते. जगभरातील वातावरण बदलाचा हा परिणाम असू शकतो.

अमेरिकेसारख्या देशात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले होते. असेच जगभरातील इतर देशांमध्येही होते आहे.’

हेही वाचलेत का:

Back to top button