कोल्हापूर महापूर : ‘काहीही होवो पण, माझी जनावरे सुखरूप राहो’ | पुढारी

कोल्हापूर महापूर : ‘काहीही होवो पण, माझी जनावरे सुखरूप राहो’

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे.

दरम्यान, शिरोळ तालुक्यात ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापूरात 6 हजार 900 जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यामुळे शेतकर्‍यांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या होत्या.

मात्र, सध्या शिरोळ तालुक्यात महापूराचे संकट आल्यानंतर शेतकर्‍यांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मुक्या जनावरावर असलेले प्रेम यानिमित्ताने दिसून येत आहे.

अधिक वाचा :

शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा या चार नद्यांच्या पाणी पातळीमुळे 43 गावे महापूराच्या विळख्यात सापडले आहेत. तोंडावर संकट असतानाही शेतकरी जीवावर उदार होवून अगदी पाण्यातून सुरक्षितस्थळी नेत आहे.

कवठेसार, चिंचवाड, अर्जुनवाड, कुटवाड, कनवाड, हसुर, शिरटी, शिरढोन, कुरूंदवाड, नृसिंहवाडी, तेरवाड, बस्तवाड, अकिवाट, राजापूर, नवे दानवाड, जूने दानवाड, राजापूरवाडी, खिद्रापूर, शिरोळ,

आगर, घालवाड, कोथळी, उमळवाड, उदगांव, मजरेवाडी, नांदणी, अब्दुललाट, शिरदवाड, औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, शेडशाळ, दत्तवाड, हेरवाड, दानोळी, टाकवडे,

धरणगुत्ती, कवठेगुलंद, घोसरवाड या गावातील जनावरे सुरक्षितस्थळी टेम्पोचा वापर केला जात आहे.

अधिक वाचा :

तर काही शेतकर्‍यांनी बैलगाडीला अनेक जनावरे बांधून सोयीच्या ठिकाणी आणण्यात येत आहे. शिवाय यांच्या चार्‍याची सोय करण्यासाठी शेतकरी धडपडत होते. तर कुटूंबातील महिला संसाराचे गाठोडे बांधत होते. अनेक गावात पाणी वाढत असल्याचे पाहून साहित्य ही स्थलांतर करण्यात येत आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 212.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा :

Back to top button