कोयनानगर जवळ कोसळली दरड, १० वाहने अडकली | पुढारी

कोयनानगर जवळ कोसळली दरड, १० वाहने अडकली

कराड : पुढारी वृत्तसेवा : गुहागर – विजापूर या महामार्गावर कोयनानगर (ता. पाटण) जवळील कामरगाव येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र असे असले तरी या घटनेत जीवितहानी झाली अथवा नाही? हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात बुधवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

या परिसरात बुधवारी दुपारपासून गुरुवार सायंकाळपर्यंत ५५० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे.

या विक्रमी पावसामुळे गुहागर विजापूर या मार्गावर काही ठिकाणी पाणी आले होते.

अधिक वाचा : 

त्यामुळे गुरुवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामरगाव गावच्या हद्दीत महामार्गावर मोठी दरड कोसळली.

यावेळी दगड, माती तसेच मोठमोठे वृक्ष रस्त्यावर पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या घटनेवेळी या परिसरातील चार दुचाकीसह 6 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अधिक वाचा : 

एक पोलिस व्हॅन सुद्धा यावेळी अडकली होती. या घटनेत काही लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या विभागातील संपर्क यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे.

अधिक वाचा : 

या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती.

या पार्श्वभूमीवर या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी झाली आहे अथवा नाही? हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.

हे ही वाचा : 

पाहा

Back to top button