उदयनराजे व बगलबच्च्यांमुळेच एमआयडीसीचे वाटोळे

उदयनराजे व बगलबच्च्यांमुळेच एमआयडीसीचे वाटोळे
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा एमआयडीसीमध्ये येणार्‍या उद्योजकांना धमक्या देणे. त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे हे त्यांचे उद्योगच आहेत. येणार्‍या प्रत्येकाला दमदाटी करायची, हप्ते मागायचे, आमची युनियन काढा, आमचे कामगार घ्या, असे प्रकार त्यांनी केले आहेत. सातारची एमआयडीसी न वाढणे याचे मूळ कारण हे खा. उदयनराजे व त्यांचे बगलबच्चे आहेत. त्यांच्यामुळेच वाटोळे झाले आहे, अशी घणाघाती टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, आम्हाला चिरडण्यासाठी हत्तीच्या पायाची गरज नाही. उदयनराजेंनी आमच्या अंगावर उडी मारली तर चालेल. आता चिरडून जाण्यासारखी अवस्था झाली आहे. पंडित ऑटोमोटिव्हची जागा कायदेशीर प्रक्रिया राबवून घेतली आहे. कामगारांची देणी देण्याची जबाबदारी आमची नाही. कामगारांनी पंडित ऑटोमोटटिव्ह आणि बँक ऑफ बडोदाकडे देणी मागितले पाहिजे. कामगारांच्या देण्यांचा उदयनराजेंचा हा सातारा नगरपालिका निवडणुकीचा मार्ग असल्याचाही टोला आ. शिवेंद्रराजे यांनी लगावला.

हा पूर्ण बोगसपणा आहे यात काही तथ्य नाही. मला कामगारांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही राजकीय पदाधिकार्‍यांच्या मागे लागला तर काही निष्पन्न होणार नाही. तुमचा फक्त राजकीय वापर होईल. निवडणूकीपूरता तुमचा फक्त विषय होईल परत काही होणार नाही. जिथे योग्य मार्ग आहे तोच कामगारांनी व त्यांच्या युनियनने पकडावा. योग्य पध्दतीने न्यायालयात दाद मागावी. त्या माध्यमातून त्यांची जी देणी आहेत ती घ्यावीत.

सातारा एमआयडीसी न वाढणे याचे मूळ कारण कायम उदयनराजे व त्यांचे बगलबच्चे आहेत. प्रत्येक उद्योजकाकडून हप्ते मागायचे. आमची युनियन काढा, आमची माणसे घ्या, बघतो, दाखवतो अशा भाषेमुळे व वागण्यामुळेच सातारची एमआयडीसी वाढली नाही. त्यांनी आम्हाला सांगायचा प्रयत्न करू नये. एमआयडीसीची वाट लागण्याचे कारण ते स्वत:च आहेत. आम्ही साई अ‍ॅग्रोटेकचे मालक आहेत. तिथे खासदार जरी आले तरी काही होणार नाही. आम्ही ट्रेसपासचे गुन्हे दाखल करण्यासाठी कायदे वापरणार, असा इशाराही आ. शिवेंद्रराजेंनी दिला.

सातारा एमआयडीसीतील जागा तुमच्यासारख्यांनी लाटल्या असा त्यांचा आरोप आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आमच्यासारखे म्हणजे काय? आम्ही काय पाकिस्तानातून आलो? आम्हाला जागेत इनव्हेस्ट करायचे असेल तर, हा व्यवसाय आहे. उदयनराजे सोडून सगळेच व्यवसाय करतात. आम्ही जागा घेतली बाकीच्यांचे आम्हाला माहिती नाही. या जागेत कारखानदारी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.

एखादी जागा पडून राहणे त्याचा सातारकरांना फायदा काय आहे? महाराष्ट्र स्कूटरची 24 ते 30 एकर जागा पडून ती दुर्दैवाने सुरू झालेली नाही. अनेक वर्षे पाठपुरावा करून अजून ते त्यावर काहीही करत नाही. पंडित ऑटोमोटिव्हची जागा अशीच पडून होती. त्या जागेचा वापर कोणासाठीही होत नव्हता. त्यामुळे लिलावात ही जागा आम्ही घेतली. ही जागा कायदेशीर प्रक्रियेतूनच विकत घेतली. ती जागा 28 उद्योजकांना दिली आहे. जो-तो आपल्या कुवतीप्रमाणे उद्योग सुरू करेल.

कामगारांची देणी देण्याची आमची जबाबदारी नाही. हा विषय आमच्याकडचा नाही. एनसीआरटी व अवसायकानुसार हा व्यवहार केला आहे. पंडित ऑटोमोटिव्ह, बँक ऑफ बडोदाकडे कामगारांनी देणी मागितली पाहिजे. कामगारांनी देणी मिळवण्यासाठी योग्य मार्ग धरावा. हा नगरपालिकेचे इलेक्शन आले म्हणून उदयनराजेंनी हा मार्ग धरला आहे. यातून कायदेशीर काहीही निष्पन्न होणार नाही. या प्रकरणाच्या सर्व परवानग्या पोलिसांना दाखवल्या होत्या. कामगारांनी बोलावले होते. कोणीही कामगारांच्या बाजूने निकाल दिलेला नाही, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

कशाला उगीच हत्ती आणता… उडी मारून चिरडून टाका

हत्तीच्या पायाखाली चिरडले असते असे वक्तव्य उदयनराजेंनी केले आहे, त्यावर बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कशाला उगीच हत्ती आणता. वनविभागाची परवानगी घेता. हे करण्यापेक्षा तुम्ही जलमंदिरमध्ये राहता, मी सुरूचीत राहतो तेथून या आणि उडी मारून चिरडून टाका, अशी अवस्था झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news