नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रेखाचित्र काढून अर्पण केली लतादीदींना आगळीवेगळी श्रद्धांजली | पुढारी

नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रेखाचित्र काढून अर्पण केली लतादीदींना आगळीवेगळी श्रद्धांजली

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा :  भारताचा दैवी स्वर म्हटल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी पद्मविभूषण भारतरत्न लतादीदी यांची काल सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात प्राणज्योत मालवल्याचे वृत्त प्रत्येक कलारसिकांप्रमाणेच प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनावर आघात करून गेले आहे. अशातच अनेक लेखक, पत्रकार, संगीतकार, गायक, वादक विशेष लेख आणि गीत सादर करीत लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनीसुद्धा अत्यंत सुंदर असे लतादीदींचे रेखाचित्र रेखाटून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी काढलेल्या या रेखा चित्रात लतादीदींचे खास ठेवणीतले निर्मळ आनंदी शांत स्मित जसेच्या तसे रेखाटलेले पाहायला मिळते. लतादीदींच्या चेहऱ्यावरची सात्विकता देखील रेखाटण्यात ते यशस्वी झाले आहेत. पोलीसदला सारख्या कठोर मानल्या जाणाऱ्या विभागात असा सृजनशील कलाकार असू शकतो. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी चित्रकलेतील अधिकृत कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. ही त्यांची उत्स्फूर्त कला व कसब आहे.

हे ही वाचलं का

Back to top button