

जत :पुढारी वृत्तसेवा
एका हॉटेल चालकाला गावठी बनावटीचे पिस्तूल दाखवून वीस लाखांची मागणी केल्याप्रकरणी, दोघांना अटक करण्यात आली आहे. विनोद चंदू कांबळे (वय.२९), सतीश चन्नाप्पा मिंनचीकर. (वय .३०) (दोघे रा. मेंढेगिरी ता. जत) यांच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (जत क्राईम) दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, याबाबतची फिर्याद विवेक विजय चव्हाण यांनी जत पोलिसांत दिली आहे.
संशयित आरोपी विनोद कांबळे व सतीश मिंनचीकर या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी यांच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत चार काडतुसे जप्त केले आहे. (जत क्राईम)
याबाबत अधिक माहिती अशी, विवेक चव्हाण व विनोद कांबळे या दोघांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय होता. त्यामध्ये नुकसान झाल्याने एकमेकांचा मोठा वाद झाला होता. दरम्यान शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी विनोद कांबळे व त्याचा मित्र सतीश मिणचेकर या दोघांनी भागीदारी असणाऱ्या हॉटेल व्यवसायिक विवेक चव्हाण यांच्यावर पिस्तुल रोखले. आणि वीस लाख रुपये देणार आहे का नाही ? असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. (जत क्राईम)
यावेळी विवेक चव्हाण यांनी त्यांना ढकलून देत स्वतःचा बचाव करण्यासाठी लपून बसले. याबाबतची माहिती चव्हाण यांनी पोलिसांत दिली. त्यावेळी पोलीस नाईक आगतराव मासाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघा संशयित आरोपींना पळून जात असताना पाठलाग करून मेंढेगिरी रस्त्याजवळ ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडील पिस्तूल व काडतुसे जप्त केली.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खरात करत आहेत.
हे ही वाचा :