मोठी बातमी : कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

गेल्या १९ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत ४१ टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद मैदानात अजूनही आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातूनही आज मोठी घोषणा करण्यात आली आहे.

एसटी कर्मचारी आंदोलन शुक्रवारी सायंकाळपासून तात्पूरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी लढा सुरूच राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. याशिवाय आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाया शासनाने मागे घ्याव्यात अशीही मागणी त्यांनी केली.

कोल्हापूर विभागातील सायंकाळी चार वाजेपर्यंतची चालनिय माहिती

इचलकरंजी आगार

  • इचलकरंजी ते कोल्हापूर मार्गावर ०२ फेऱ्या

कागल आगार

  • कागल-पुणे मार्गावर ०२ फेऱ्या

कोल्हापूर आगार

  • कोल्हापूर-स्वारगेट (खासगी शिवशाही) – ०२फेऱ्या
  • कोल्हापूर- सांगली १ फेरी
  • कोल्हापूर – इचलकरंजी १ फेरी

चंदगड आगार

  • चंदगड -शिनोळी मार्ग ०४ फेऱ्या
  • चंदगड- हलकर्णी ०१ फेरी
  • हलकर्णी -शिनोळी ०१फेरी
  • चंदगड-पाटणे फाटा ०१फेरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news