पिंपरी : प्रेयसीचा खून करून तिच्याच साडीने तरुणाची आत्महत्या, नग्नावस्थेत मृतदेह आढळले | पुढारी

पिंपरी : प्रेयसीचा खून करून तिच्याच साडीने तरुणाची आत्महत्या, नग्नावस्थेत मृतदेह आढळले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

प्रेयसी महिलेचा खून करून तरुणाने तिच्याच साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दिघी येथील एका लॉजमध्ये दोघांचे नग्नावस्थेत मृतदेह मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी पावणे बाराच्या सुमारास उघडकीस आली. वैशाली चव्हाण (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, तिचा प्रियकर प्रकाश महादेव ठोसर (वय 28, दोघे रा. अजंठानगर, चिंचवड) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ सामन्या दरम्यान प्रेक्षकांचा जल्लोष

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले मृतदेह

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत वैशालीचा पती प्रशांत उर्फ परशा चव्हाण हा येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याने ती एकटीच राहत होती. दरम्यान, वैशाली हिचे मयत प्रकाश याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. ते दोघे दिघी येथील मॅगझीन चौकातील अथर्व लॉज येथे नेहमी भेटत होते. बुधवारी (दि. 24) देखील दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी एक खोली घेतली. त्यानंतर ते खोलीबाहेर आलेच नाहीत.

मोठी बातमी : कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

दिघी येथील घटना

दरम्यान लॉज मॅनेजर यांनी गुरुवारी सकाळी खोलीचे दार वाजवले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सुरक्षारक्षकाच्या मदतीने त्यांनी दार उघडले असता वैशाली हीचा बेडवर तर, प्रकाशचा नग्नावस्थेत लटकलेला मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वैशाली हिचा गळा दाबून खून केल्यानंतर प्रकाश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

Back to top button