सांगलीत आज मराठा महामोर्चाचे आयोजन; विश्रामबाग चौक घोषणांनी दणाणून गेला | पुढारी

सांगलीत आज मराठा महामोर्चाचे आयोजन; विश्रामबाग चौक घोषणांनी दणाणून गेला

सांगली ; पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी तसेच जालना येथे आंदोलकांवर झालेला अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज (रविवार) येथे मराठा समाजाचाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने समाजातील लोक एकत्रित येत आहेत. हा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.

दरम्यान महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग, पार्कींग व्यवस्थाही निश्चित केली आहे. मोर्चासाठी आचारसंहिता बनविण्यात आली असून, त्याचे पालन करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने करण्यात आले आहे. ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button