जत : सिंगनहळ्ळीत दाम्पत्यास काठीने बेदम मारहाण | पुढारी

जत : सिंगनहळ्ळीत दाम्पत्यास काठीने बेदम मारहाण

जत; पुढारी वृत्तसेवा : सिंगनहळळी (ता. जत ) येथे वडिलोपर्जित जमीन जास्त का देत नाही, या कारणावरून पती-पत्नीस काठीने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तुकाराम महादेव हिप्परकर व विशाल तुकाराम हिप्परकर (दोघे रा. सिंगनहळळी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला Jat: Couple brutally beaten with stick in Singanahalliआहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे .

कमल ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर हिप्परकर, तुकाराम हिप्परकर व विशाल हिप्परकर यांच्यात जमीन वाटपावरून वाद सुरू आहे. शुक्रवारी याच वादातून तुकाराम हिप्परकर, विशाल हिप्परकर हे दोघे ज्ञानेश्वर हिप्परकर यांच्या घरासमोर आले. यावेळी तुम्ही जमीन जास्त दिली पाहिजे असे सांगत पती, पत्नीला मारहाण केली.

Back to top button