सांगली : ‘परीक्षेच्या टेन्शनवर मानसतज्ज्ञांचे सोल्युशन’ कार्यशाळेला प्रतिसाद | पुढारी

सांगली : ‘परीक्षेच्या टेन्शनवर मानसतज्ज्ञांचे सोल्युशन’ कार्यशाळेला प्रतिसाद

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कस्तुरी क्लब व आपलं एफ .एम. 91.9 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तणाव नियोजन कार्यशाळेला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येणारा परीक्षेचा हंगाम सर्वांसाठी तणावरहित जावा यासाठी मानसतज्ज्ञ कपिल लळीत यांनी उत्तम मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी रजपूत शैक्षणिक संकुलचे सहकार्य लाभले.

परीक्षेच्या काळात मुलांना येणार्‍या अडचणी, होणारे मानसिक बदल, पालकांच्या अपेक्षा या सर्व भावना हाताळताना, विद्यार्थी व पालकांनी मिळून काम केल्यास चांगला रिझल्ट मिळू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं. टेन्शन घेण्यापेक्षा अभ्यास, आहार आणि वेळेचं पूर्व नियोजन केल्यामुळे परीक्षेच्या आधीची भीती व गडबड यावर विद्यार्थी सहज मात करू शकतात. तज्ज्ञांनी तणावाची वेगवेगळी लक्षणे सांगून त्यावरचे उपाय हे सांगितले व येणार्‍या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षेच्या आधी ही कार्यशाळा घेतल्यामुळे आम्हाला याचा नक्की फायदा होईल, अशी प्रतिक्रिया पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, तसेच या कार्यशाळेबद्दल ‘पुढारी’ समूहाचे आभार मानले.

Back to top button