सांगली : भोंदूबाबांच्या काळ्या लीलांना उत | पुढारी

सांगली : भोंदूबाबांच्या काळ्या लीलांना उत

इस्लामपूर : संदीप माने : कापूरवाडी येथे पैशाचा पाऊस पाडतो म्हणून एका भोंदूने जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला ५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. यामुळे भोंदूंच्या अनेक काळ्या लीला चव्हाट्यावर आल्या आहेत. तालुक्यात छुप्या पद्धतीने भोंदूगिरी सुरू असल्याची चर्चा आहे.

समस्यांनी, आर्थिक परिस्थितीने पिचलेले लोक भोंदूंना बळी पडत आहेत. भोंदूगिरीबाबत तक्रारी देण्याचे आवाहन अंनिसने केले आहे. वाळवा तालुक्यात शैक्षणिक, आर्थिक क्रांती झाली आहे. पुरोगामी चळवळींना बळ मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भोगिरीलाही काही लोक बळी पडत आहेत. लग्नाच्या समस्या, आर्थिक समस्या, जुनाट आजारपण, करणी, भूतबाधा आदी समस्या दूर करतो, असे आमिष दाखवून भोंदू नागरिकांना जाळ्यात अडकवित आहेत.

आर्थिक अडचण, आजारपण, समस्यांनी ग्रासलेली कुटुंबांच्या पाय झिजवत आहेत. देवरसपणाच्या नावाने अंगारे, दोरे, गंडे देवून पीडित कुटूंबियाना गिऱ्हाईक बनविले जाते. यासाठी काही एटांचीही मदत घेतली जाते. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले जाते.
भूतबाधा, करणी काढण्यासाठी आर्थिक पॅकेज ठरविले जाते. पशुबळीसाठी भोंदूकडून पैशाची मागणी केली जाते. या इस्लामपूर, आष्टा, सुरूल परिसरातही भोंदूबाबांचा पर्दाफाश अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. निवडणुकीत काही भोंदूकडे, देवरशांकडे लोकांचा राबता वाढला आहे.

काही नागरिक अंधश्रद्धेपोटी गावांना बळी पडत आहेत. नागरिकांनी ‘वैज्ञानिक एष्टीकोन ठेवून शहानिशा करावी. चमत्काराचा, समस्या दूर करण्याचा दावा कोण भोंदू करत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अगोदर कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
– प्रा. सतीश चौगुले, अंनिस कार्यकर्ते, इस्लामपूर.

 

Back to top button