मिरज : कुत्र्यांना वाचविताना अपघात होवून एक ठार | पुढारी

मिरज : कुत्र्यांना वाचविताना अपघात होवून एक ठार

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  भटक्या कुत्र्यांना वाचविताना झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दीपक उत्तमराव तोडकर (वय 40, रा. जुना बुधगाव रस्ता, लक्ष्मीनगर, सांगली) हे जागीच ठार झाले. तर राजू नितीपुडी (वय 50 रा. बेजू यादव चाळ, अंधेरी ईस्ट, मुंबई) हे गंभीर जखमी झाले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक तोडकर हे नारळ विक्रेते आहेत. ते व त्यांचा मित्र राजू नितीपुडी हे दोघे मंगळवारी सकाळी मोटारसायकलवरुन कोल्हापूर-मिरज रस्त्याने येत होते. ते रेल्वे पुलाजवळ असलेल्या जुना टोलनाका जवळ आले असता चार ते पाच कुत्र्यांचा कळप अचानक रस्त्यावर आला.
कुत्र्यांना वाचविताना दीपक तोडकर यांचे मोटारसायकलवरील संतुलन बिघडल्याने ही मोटारसायकल स्लीप झाली. ती थेट कोल्हापूरकडे भाजीपाला घेवून जाणार्‍या (एम.एच. 09 एफएल- 4505) या टेम्पोवर जोरदार जावून आदळली. जोरदार धडक बसल्याने त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Back to top button