इस्लामपूर : भाजपाने अन्‍नाच्या घासावरही कर लावला | पुढारी

इस्लामपूर : भाजपाने अन्‍नाच्या घासावरही कर लावला

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकार अन्‍नाच्या घासावरही कर लावत असेल तर सामान्य माणसाने जगायचे कसे? मात्र आता स्वस्थ बसून चालणार नाही. केंद्र सरकारच्या या अन्यायी धोरणांविरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ वळावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

येथील बेघर वसाहत, मॉडर्न हायस्कूल, सिद्धेश्वर मंदिर, पोतदार हॉल व माळी गल्ली येथील संवाद बैठका झाल्या. यावेळी ते बोलत होते. प्रतीक पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, सुभाषराव सूर्यवंशी, दादासो पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, संदीप पाटील, रोझा किणीकर, शंकरराव चव्हाण, अरुण कांबळे, मुकुंद कांबळे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. पूर्वी 400 रुपयाला मिळणारा गॅस सिलिंडर 1065 रुपयांवर गेला. महागाईने कळस गाठला आहे. रुपयाचे अवमूल्यन होऊन पूर्वी 70-72 रुपयाला मिळणारा डॉलर आता 80 रुपयांवर गेला आहे. केंद्र सरकारने कपड्यावर कर आकारला. आता तर त्यांनी अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी आकारला आहे. सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.

ते म्हणाले, आपण तहसीलदार कार्यालय इमारतीस 14 कोटींचा निधी दिला, इमारत पूर्ण केली. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पात इस्लामपूरचा समावेश केला. यावेळी प्रा. शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, अ‍ॅड. संपतराव पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, युवराज पाटील, सविता आवटे, बशीर मुल्ला, विलास ताटे, विनायक सदावर्ते, दिलीप जावळे, कमल पाटील, प्रतिभा पाटील, सुरेखा जगताप उपस्थित होते.

Back to top button