सांगली : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधा | पुढारी

सांगली : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता पहिलीला शिकवणार्‍या शिक्षकांनी 15 दिवसांतून एकदा अंगणवाडीमध्ये जावून विद्यार्थ्यांची संवाद साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान होण्यासाठी शिक्षण विभागाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड तसेच विस्तार अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, 3 ते 9 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी जिल्हा एकात्मिक बालविकास अधिकारी यांनी कार्यपुस्तिका छापील व डिजिटल तयार करून ते अंगणवाड्यांना पुरवा. त्यावर आधारीत प्रशिक्षण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षेक यांना द्या. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून तरतूद करा.

इयत्ता 1 ली ते 10 वी मधील शिक्षकांनी एनएएस अभ्यासक्रमावर आधारित विषयनिहाय सरावा घ्यावा. शाळास्तरावर तीन महिन्यांनी चाचणी घ्यावी. त्याची पडताळणी चेकलिस्ट नुसार केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत करावी, असा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यावेळी सुकाणू समितीच्या मान्यतेने अध्ययन -अध्यापनान शास्त्र या क्षेत्रातील भाषा विषयाचे तज्ज्ञ विक्रम पाटील, गणित विषयाचे तज्ज्ञ बाहुबली नोरजे या दोन तज्ज्ञांच्या निवडीस मान्यता देण्यात आली.

Back to top button