मूल्ये-तत्त्वे अव्याहत जिवंत ठेवा | पुढारी

मूल्ये-तत्त्वे अव्याहत जिवंत ठेवा

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा अण्णासाहेब डांगे म्हणजे बहुविद्याशाखीय चालते-बोलते विद्यापीठच आहे. आप्पांच्या चांगल्या गुणांचा अंगीकार सर्वांनी केला तर आप्पांच्या ठायी असलेली मूल्ये व तत्त्वे जिवंत ठेवण्यास नक्‍कीच मदत होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्‍त केले. संत ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेच्यावतीने संस्था स्नेहमेळावा, मातोश्री सुभद्राबाई डांगे स्मृतिदिन व अण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे माजी कुलगुरू डॉ. पी. डी. बंडगर, कुलपती डॉ. दीपकराव टिळक, डॉ. वसंतराव जुगळे, डॉ. एम. आर. शियेकर, श्रीधर हेरवाडे, प्रा. आर. ए. कनाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. एकनाथ पाटील यांनी श्रद्धांजली संदेशाचे वाचन केले. अ‍ॅड. चिमण डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘कोण अण्णा डांगे?, ‘पोवाड्यातील होळकरशाही व रानमेवा’ या पुस्तकांसह संस्था कर्मचार्‍यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अण्णासाहेब डांगे म्हणाले, स्वकर्तृत्वावर उभारलेल्या संस्थेचे यश हे माझे नसून हजारोंच्या संख्येने या संस्थेस जोडलेल्या हातांनी केले आहे. यावेळी विठ्ठलराव मुसाई, विश्‍वनाथ डांगे, सत्तू ढोले, संभाजी कचरे, सुनील मलगुंडे, प्रकाश कदम, अविनाश खरात, अशोकराव देसाई आदी उपस्थित होते.

सुनील शिणगारे, दीपक अडसूळ, संतोष मोहिते, अजित माने, विजय पाटील, अशोक घोरपडे यांनी संयोजन केले. ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. संपतराव पाटील यांनी आभार मानले. आयुष्यातील काट्यांना सुगंध… सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने मी वागतो. जे आपल्या मार्गात काटे पसरतील त्यांच्या मार्गात फुले पसरावीत, हा मंत्र मी जपून ठेवला आहे. काही अडचणीचे प्रसंग आल्यावर या मंत्राचे मी स्मरण करतो. त्यामुळे आमच्या आयुष्यातील काट्यांना सुगंध प्राप्‍त झाला असल्याचे अण्णा डांगे यांनी सांगितले.

Back to top button