सांगली : विनयभंग, बलात्काराची पारधी महिलेची तक्रार | पुढारी

सांगली : विनयभंग, बलात्काराची पारधी महिलेची तक्रार

सांगली : पुढारी वृत्तसेवा वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील एका पारधी महिलेने दोघांनी चाकू हल्ला करून मारहाण करून बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. याबाबतचे निवेदन सदर पीडित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, फाळकेवाडी येथे दि. 24 जून रोजी रात्री हा प्रकार घडला. घरात आपण एकटी असल्याचे पाहून दोघे संशयित घरात शिरले, घरातील कोणी नव्हते.

या दोघांनी डोक्यात चाकूने वार केला. तसेच विनयभंग करून बलात्कार केला. तसेच पोलिसात तक्रार द्यायची नाही, अशी धमकी दिली. पहाटे कोल्हापूर सीपीआरमध्ये उपचारासाठी गेले, तेथे उपचार करण्यात आले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी आष्टा पोलिसांत गेल्यानंतर पोलिसांनीदेखील आपली दखल घेतली नाही. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन हल्लेखोर आणि डोळेझाक करणारे पोलिस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदर पीडित महिलेने दिलेल्या निवेदनात केली आहे.

Back to top button