सांगली : जिल्ह्यात 83 गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना | पुढारी

सांगली : जिल्ह्यात 83 गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या 13 प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अडचणीत असल्याने बंद आहेत. या योजनेत असणार्‍या 83 गावांचा जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

काही वर्षापासून प्रादेशिक योजनांची वाढती थकबाकी आणि दुरुस्तीअभावी योजना अडचणीत सापडल्या आहेत. काही गावांनी स्वतंत्र पाणी योजनाही केल्या आहेत. जी गावं प्रादेशिकमध्ये आहेत, त्यांना अनियमित पाणीपुरवठा राहतो. त्यामुळे या गावांची प्रादेशिक योजनातून बाहेर पडून स्वतंत्र पाणी योजनांची मागणी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. योजनेतून स्वतंत्र योजना मंजूर झालेल्या गावांमध्ये मिरज तालुक्यातील कळंबी, ढवळी, खोतवाडी, बिसूर, तासगामधील डोर्ली, शिरगाव-कवठे, बिरणवाडी, नेहरुनगर, दहीवडी, यमगरवाडी, खुजगाव, निमणी, पेड, गोटेवाडी, सावर्डे, विसापूर, कुर्ली, गौरगाव, जुळेवाडी, नागाव निमणी, भैरववाडी, बस्तवडे, मतकुणकी, धुळगाव, योगेवाडी, कडेगाव तालुक्यातील कोथवडे, अपशिंगे, नेर्ली, हिंगणगादे, कोतीज, तोंडोली, येतगाव, नेवरी, येडे, तुपेवाडी, भिकवडी, कान्हरवाडी, कोतीज, खेराडे विटा, तोंडोली, रायगाव. शिराळा तालुक्यातील रांजनवाडी, गिरजवडे, रेड, वाघापूर, वाकाईवाडी, शिरसटवाडी, सावंतवाडी, बेलेवाडी, कांदे, अस्वलेवाडी, घागरेवाडी, येळापूर, गवळेवाडी, मेनी, खिरवडे, कवठेमहांकाळमधील थबडेवाडी, जायगव्हाण, आगळगाव, शेळकेवाडी, अलकूड एस, पिंपळवाडी, धुळगाव, वाळव्यातील अहिरवाडी, साटपेवाडी, हुबालवाडी, किल्लेमच्छिद्रगड, बेरडमाची, पलूस तालुक्यातील सुखवाडी, ब्रम्हनाळ, खानापूर तालुक्यातील पळशी, कुसबावडे, जखिणवाडी, मेंगणवाडी, गोरेवाडी, धोंडेवाडी, भडकेवाडी, शेंडगेवाडी या गावांचा समावेश झाला आहे.

Back to top button