रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस | पुढारी

रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस

रायगड; पुडारी वृत्तसेवा:  रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रोहे येथील कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहू लागली आहे.

अधिक वाचा 

 शहरासह ग्रामीण भागात रात्रभर तुफान पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे, भरून वाहू लागले आहेत. मोठया प्रमाणात डोंगर माथ्यावरून पावसाचे पात्रात येत असल्याने कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहू लागली आहे.

अधिक वाचा 

रोहा- अष्टमी शहराला जोडणारा जुन्या पुलाला पाणी लागले

 शहराला जोडणारा जुन्या पुलाला लागले पाणी आहे. त्यामुळे नागरिकाच्या सुरक्षेसाठी पुलाजवळच्या हॉटेल प्राईड येथे वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहे.

अधिक वाचा 

काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे. या भागात मोठया प्रमाणात शेतात पाणी साचले आहे. असाच पाऊस दिवसभर राहिल्यास कुंडलिका नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि.१९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इशारा पातळीपेक्षा जास्त पाणी कुंडलिका नदीच्या पात्रात वाहत होते. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button