पनवेल; विक्रम बाबर : खारघर सेक्टर ५ येथील धबधब्यावर गेलेल्या ११८ पर्यटकांची खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. रविवारी कोसळणाऱ्या पावसाचा फटका खारघर येथील धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्यांना सहन करावा लागला.
अधिक वाचा
शहरातील वातावरण मनमाेहक झाले होते. रविवारी सुटी असल्याने अनेकांना बाहेर पडण्याचा मोह काही आवरता आला नाही. अनेकांनी कुटुंबासोबत चिंब भिजून पावसाचा आनंद घेतला.
काहींनी, धबधब्यावर जाऊन सहलीचा आनंद लुटला. अशा वर्षा पर्यटनाचा सहलीचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर गेलेल्या ११८ जणांना कटू अनुभव आला.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पनवेल, नवी मुबई आणि खारघरमधील अनेक कुटूंबाचे पावले रविवारी धबधब्यामुळे वळाली. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी असल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता.
१२ नंतर मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला. अडकलेल्या पर्यटकांना हा प्रवाह ओलांडणे शक्य नव्हते. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे ११८ पर्यटक अडकून बसले.
यामध्ये ७८ महिला ३८ पुरुष आणि ५ मुलांचा समावेश होता.
अधिक वाचा
पाण्याचा प्रवाह कमी होईल आणि आपण बाहेर निघू ,अशी वाट पर्यटक बघत होते, मात्र पाण्याचा प्रहाव वाढतच राहिला.
यावेळी एका पर्यटकाने खारघर अग्निशमन दलाला फोनवर याची माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याच्या मोठ्या प्रवाहाचा सामना अग्निशमन दलाच्या जवानांना करावा लागला .
रस्सी टाकणे घातक असल्याचे लक्षात आले. यानंतर 3५ फूट शिडीच्या सहायाने अग्निशमन दलाच्या जवानांनी ११८ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.