

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड शहरासह तालुक्यात मागच्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील पर्जन्यवृष्टीने सावित्री आणि गांधारी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान भोईघाट परिसरातून शहरात सावित्री नदीचे पाणी येण्यास काही अंतर बाकी आहे. गांधारी नदीचे पाणी नाते खिंड ते दस्तुरी नाका मार्गावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
मिळालेल्या माहितीनुसार महाडमार्गे लाटवण दापोली या मार्गावर पाणी आल्याने तो बंद करण्यात आला आहे. तसेच तुडील चिंभावे या मार्गावरील रेवतळे व रावढळ या गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
परिसरात स्थानिक पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करु नये असे आवाहन करण्यात आले आहे .
अधिक वाचा :
शहरालगतच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सावित्री नदी इशारा पातळीवरून वाहत असून धोक्याचा इशारा ६.५० मीटर इतका आहे.
या संदर्भात शासकीय यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलेल्या इशार्याचा व बाबींचा विचार करता महाड शहर तसेच ग्रामीण परिसरात स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिक बंधू भगिनींनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
हे ही वाचा :