

पुढारी ऑनलाईन डेस्क : पृथ्वीच्या दिशने एक सौर वादळ अत्यंत वेगाने येत आहे. हे वादळ आज पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळण्याची शक्यता आहे.
हे वादळ पृथ्वीच्या दिशेने १६ लाख किलोमीटर प्रतितास वेगाने येत आहे. या वादळामुळे जगभरातील वीज पुरवठा आणि संपर्क उपकरणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सूर्याच्या वातावरणातून वेगळे होत असलेले एक सौर वादळ पहिल्यांदा ३ जुलै रोजी आढळून आले होते.
हे वादळ जास्तीत जास्त ५०० किमी प्रतिसेकंद वेगाने प्रवास करत आहे अशी माहिती स्पेसवेदर डॉट कॉमने दिली आहे.
या वादळामुळे पृथ्वीचे संपूर्ण चुंबकीय क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता नाही.
वरच्या स्तरावरील चुंबकीय क्षेत्रात काही हलक्या हलचाली दिसतील. यात ते क्षेत्र प्रज्वलित झाल्यासारखे दिसेल.
याचबरोबर पृथ्वीच्या वरच्या वातावरण क्षेत्रातील कृत्रिम उपग्रहावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे याचा थेट परिणाम जीपीएस नॅव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्ही यावरही होईल.
याचबरोबर पॉवर ग्रीडदेखील प्रभावित होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :
अमेरिकेतील स्पेस वेदर अंदाज केंद्राने अंदाज वर्तवला आहे. यानुसार या सौर वादळाने हाय फ्रिक्वेंसी रेडिओ कम्युनिकेशन देखील तासाभरासाठी ब्लॅक आऊट होण्याची शक्यताआहे.
या केंद्राने या सोलार वादळ ला एक्स १ लेव्हल हा स्तर दिला आहे. एक्स आणि पुढचा क्रमांक हे या सौर वादळाचे वर्गीकरण करण्यासाठी वापरण्यात आले आहेत.
अशा प्रकारची सौर वादळे सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटामुळे तयार होतात. यातून उर्जा, प्रकाश आणि प्रचंड वेगाने कण अंतराळात फेकले जातात.
नासाने दिलेल्या माहितीनुसार एक्स श्रेणीतील वादळे ही सर्वात मोठी वादळे असतात.
सोलार वादळांची श्रेणी ही त्यांच्या ताकदीवर ठरवण्यात येते.
सर्वात लहान सौर वादळ हे ए श्रेणीत ठेवले जाते. त्यानंतर बी, सी, एम आणि एक्स वादळांची अशा श्रेणीत विभागणी केली जाते.
आज पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकणाऱ्या सौर वादळाची श्रेणी ही एक्स क्लास आहे.