अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका; प्रकृती स्थिर

अमोल मिटकरी
अमोल मिटकरी
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात भरती केल्याने तत्काळ उपचार सुरु झाले.

शहरातील एका फार्मसी कॉलेजमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात गीत गात असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे ह्या 11 जुलै रोजी अकोला दौऱ्यावर होत्या.

अधिक वाचा 

अमोल मिटकरी
अमोल मिटकरी

शहरापासून काही अंतरावर हिंगणा येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांनी मनोगतादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक गीत गायला सुरवात केली.

तेवढ्यात त्यांची बोबडी वळली व आवाज बदलून किंचीत तोंडही वाकडे झाले. हा प्रकार जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मिटकरींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. वेळेवर उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे खुद्द त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

हे ही वाचलं का? 

पहा व्हिडिओ 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news