कोल्हापूर : कोव्हीशिल्डचा ४५ वर्षांवरील नागरिकांना उद्या मिळणार दुसरा डोस | पुढारी

कोल्हापूर : कोव्हीशिल्डचा ४५ वर्षांवरील नागरिकांना उद्या मिळणार दुसरा डोस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर मध्ये कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना मंगळवारी (दि. १३) कोव्हीशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. दुस-या डोससाठी 84 दिवसापेक्षा जास्त दिवस झालेल्या नागरिकांनाच प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.

मंगळवारी ज्या नागरिकांना महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनीच लसीकरणा करीता विविध ११ आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे.

लसीकरणापुर्वी आरोग्य केंद्राच्या बाहेर नागरिकांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी ज्या केंद्रामध्ये नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्याच केंद्रामध्ये लसीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Back to top button