सुपा : कत्तलीसाठी चालविलेल्या 59 जनावरांची सुटका

सुपा : कत्तलीसाठी चालविलेल्या 59 जनावरांची सुटका

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : अवैध कत्तलीसाठी चालविलेल्या 59 कालवडी, वासरे, गायींना वाचविण्यात बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांना यश आले आहे. राजा हुसेन शेख, अमर हाजी शेख, हुसेन इमाम शेख (तिघेही रा. निरावागज, ता. बारामती), कौसीन जमील कुरेशी, आरिफ राजू कुरेशी (दोन्ही रा. पंजाब वस्ताद चौक, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर), मोहम्मद गुलाब तांबोळी (रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांच्यावर सुपा पोलिस ठाण्यात प्राणिसंरक्षण अधिनियम व प्राण्यांना निदर्यतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

गुरुवारी (दि. 14) रात्री गस्त घालताना सुपा पोलिस ठाण्याचे नाईक डी. ड.भ धुमाळ, अंमलदार के. व्ही. ताडगे यांना पहाटे बाबुर्डी गावच्या कर्‍हा नदीच्या पुलाजवळ दोन संशयित पिकअप उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांनी तपासणी केली असता दोन्ही पिकअपमध्ये मिळून 45 जर्सी गायींची वासरे कोंबून ठेवलेली दिसली. पिकअपमधील लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी ही वासरे अवैध ती कत्तलींसाठी घेऊन जात असल्याचे आरोपींनी सांगितले. आणखी काही जनावरे लोणी भापकर येथील मोहम्मद गुलाब तांबोळी याच्या गोठ्यामध्ये डांबून ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांना देऊन वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे रात्रगस्त उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व त्यांची टीम यांना संपर्क करून लोणी भापकर येथील गोट्यांमध्ये क्रूर पद्धतीने डांबून ठेवलेल्या 14 जर्सी गायी व कालवड अशी जनावरे ताब्यात घेतली.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहायक फौजदार जाधव, वाघोले, साळुंखे, पोलिस नाईक धुमाळ, पोलिस शिपाई जावीर, ताडगे, दरेकर, साळुंखे यांनी मिळून ही कामगिरी केली, अशी माहिती पोलिस अधिकारी नागनाथ पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news