

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस' फेम रुबिना दिलैक ( Rubina Dilaik ) हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. रुबिनाने पती अभिनेता अभिनव शुक्लासोबत एका क्रूझमध्ये बेबीबंप फोटोशूट करत लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रूबिनाला तिच्या प्रेग्नन्सीबद्दलची चर्चा रंगली होती. मात्र, तिने यावर कोणतीही माहिती दिली नव्हती. आता तिने स्वत: च सोशल मीडियावर बेबीबंप फोटोशूट करून ही गुडन्यूज दिली आहे. यानंतर चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
अभिनेत्री रुबिना दिलैकने ( Rubina Dilaik ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर अभिनवसोबत मोठ्या जहाजात फोटोशूट केलं आहे. यावेळी रूबिनाने ब्लॅक कलरच्या डेमिनवर पांढऱ्या रंगाच्या जॅकेटमध्ये तर अभिनव व्हाईट कपड्यात एकदम हॅडसम दिसत आहेत. तर दोघांनी डोल्यावर चष्मा आणि पायांत शूज परधान केले आहे. यातील एका फोटोत रूबिनाचे बेबीबंप दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'आम्ही एकमेंकांना वचन दिले होते की, आम्ही डेटिंग सुरू केल्यापासून एकत्रित जग फिरू, लग्न केले आणि आता लवकरच ❤️ एक कुटुंब म्हणून करू ?❤️ छोट्या ट्रॅव्हलरचे लवकरच स्वागत करू!'. असे म्हटलं आहे.
रूबिनाचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होतच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला आतापर्यत साडेतीन लाखाहून अधिकांनी लाईक्स केलं आहे.
हेही वाचा :