Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी स्वारगेट स्थानकात प्रवाशांचा महापूर | पुढारी

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी स्वारगेट स्थानकात प्रवाशांचा महापूर

पुणे : लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. त्यामुळे पुण्यातुन गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्थानकातील रिझर्वेशन खिडकीपासून ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रवाशांचा महापूरच लोटला आहे.
सातारा रस्त्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून रांगेत उभे राहून प्रवाशी वैतागले आहेत.

सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, तुळजापूर, बारामती, भोर, वेल्हा या भागातील नागरिकांना बॅगा घेऊन तासनतास ताटकळत उभं राहून देखील गाड्या मिळत नाहीत. दर वर्षी सणासुदीच्या काळात सामान्य नागरींकांची हेळसांड होताना दिसत आहे. स्वारगेट प्रशासनाच्या ढीम कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा

राजूरच्या सरपंच पुष्पा निगळेंसह नवाळींचे सदस्यत्व कायम

Ganeshotsav 2023 News : पुण्यात सणासुदीच्या तोंडावर समस्यांचा विळखा; राडारोडा उचलणार कधी?

Pune News : ससूनमध्ये आठ महिन्यांत 3 लाख रुग्णांवर उपचार

Back to top button