

सासवड : गेल्या काही दिवसांपासून पुरंदरच्या पश्चिम भागात रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता दररोज पडत असलेल्या धुक्यामुळे पुन्हा संकट आले आहे.
याबाबत सोमुर्डीचे शेतकरी शांताराम भोराडे म्हणाले की, धुक्यामुळे कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत, तर टोमॅटो, कांदा, घेवडा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, झेंडू, शेवंतीची वाढ खुंटली आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या पिकांवर दिसून येत आहे.
टोमॅटोची फळे मोठ्या प्रमाणात उकललेली आहेत. धुक्यामुळे पेरू फळावर देवीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव व फळ उकलणे अशा अनेक समस्या उद्भवत आहेत, असे बोपगावचे शेतकरी प्रकाश फडतरे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात रविवारी (दि. 30) पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा, ज्वारी, गहू या पिकांवर धुक्याचा परिणाम होणार आहे. या भागातील ढगाळ
वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता धुक्यामुळे पुन्हा संकट आले आहे, असे चांबळीचे शेतकरी संजय आबा कामठे यांनी सांगितले.
हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. ज्वारीचा पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी होत असल्याचे गराड्याचे शेतकरी किरण तरडे यांनी सांगितले.
वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता धुक्यामुळे पुन्हा संकट आले आहे, असे चांबळीचे शेतकरी संजय आबा कामठे यांनी सांगितले. हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. ज्वारीचा पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी होत असल्याचे गराड्याचे शेतकरी किरण तरडे यांनी सांगितले.
थंडीत कीटक व बुरशीजन्य रोगांची वाढ होऊ नये, यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी करावी. मल्चिंग (आच्छादन) वापरा आणि सिंचनाचे नियोजन करा.
श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर
दूषित हवामानाने उत्पादनात 15 ते 30 टक्के घट होण्याची शक्यता
काटेवाडी :
बारामती तालुक्याच्या पूर्व भागात उसाच्या पिकावर अचानक तुऱ्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या प्रादुर्भावामुळे सरासरी 15 ते 30 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण हंगामभर कधी अवकाळी पाऊस, तर कधी उकाडा आणि त्यानंतर सततची आर्द्रता अशा तापमानातील बदलांचा थेट परिणाम उसावर दिसून येत आहे. काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी, सोनगाव, डोर्लेवाडी, पिंपळी लिमटेक परिसरात तुऱ्याची वाढ मोठ्या प्रमाणात दिसत असून डसाच्या कांड्या आतून पोकळ होणे, पानांत छिद्रे पडणे, नवीन कोंब सुकणे आणि वाढ खुंटणे अशी लक्षणे आढळत आहेत.
बारामती- इंदापूर सीमेवरील श्री छत्रपती कारखाना तसेच बारामती तालुक्यातील इतर कारखान्यांकडून ऊसतोडीच्या टोळ्या
कार्यरत आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांना निरा डावा कालव्याचा लाभ झाल्याने येथे ऊस हा प्रमुख नगदी पीक म्हणून घेतला जातो. शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे उत्पादन कमी झाल्यास आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामानातील बदल आणि वाढलेली आर्द्रता, फुलकिडे आणि तुऱ्याच्या प्रादुर्भावास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. यामुळे ऊस वाढ कमी होऊन वजन घटते, तसेच साखर प्रमाणही घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी ऊस लवकर तोडून कारखान्याकडे नेण्याच्या प्रयत्नात आहेत.