

प्रभाग क्रमांक : 15 प्रमोद गिरी, नितीन वाबळे
काही वर्षांपूर्वी मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर आणि शेवळेवाडी या गावांचा महापालिकेत समोवश करण्यात आला. यातील काही भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तर काही भागात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी महापालिका या दोन्ही पक्षांमध्येच ‘टफ फाइट’ होईल अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, पदाधिकारी आणि माजी सरपंच या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर आणि शेवळेवाडी या भागांचा प्रभाग क्रमांक 15 मध्ये समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या 88 हजार 566 इतकी आहे. गेल्या काळात या भागांतील बहुतांशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. काही वर्षांपूर्वी या भागाचा महापालिकेत समावेश करण्यात आला असून, या ठिकाणी पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपची ताकद चांगली आहे. तसेच राष्ट्रवादी काँगेससह (शरद पवार गट) इतर पक्षांना मानणारा वर्ग या भागात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामपंचायतींचे माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असून त्यांनी निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर काही जण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
विविध पक्षांतील इच्छुकांनी तिकीट मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या पक्षातून ऐन वेळेला तिकीट मिळाले नाही तर इतर पक्षात जाऊन किंवा अपक्ष लढून निवडून येण्यासाठी देखील इच्छुक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या प्रभागात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना पक्ष प्राधान्य देईल, तेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. केशवनगर येथे 2017 पर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार पाहिला जात होता. त्या वेळी ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य होते, यातील काही जण महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
केशवनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) प्राबल्य आहे. मात्र ठाकरे गटामधील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला असून, ते देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपकडून पाच ते सहा जण इच्छुक आहेत. यामुळे पक्षाकडून तिकीट नेमके कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजंरी बुद्रुक, साडेसतरानळी आणि शेवाळेवाडी भागातूनही काही जण निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) केशवनगरमधील एकालाच उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे केशवनगरमध्ये बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षापुढे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि काँग्रेसने आघाडी करून येथे उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपपुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सर्वसाधारण जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आगामी निवडणूक चुरशीची होणार आहे.
अ गट : अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग
गट ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गट क : सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग
गट ड : सर्वसाधारण प्रवर्ग
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : राहुल तुपे, संदीप तुपे, रूपेश तुपे, जितिन कांबळे, नीलेश घुले, अजित घुले, सुधीर घुले, गौरव म्हस्के, संतोष पाखरे, राजेंद्र गारुडकर, देवेंद्र भाट, ऋ षिकेश गायकवाड, नीलकंठ माणिकशेट्टी, कांचन तुपे, सोनाली घुले, पूनम घुले, रोहिणी तुपे, शैला म्हस्के-घुले.
भाजप : शिवराज घुले, संदीप लोणकर, भूषण तुपे, अमित घुले, प्रमोद कोद्रे, सुमित घुले, पुरुषोत्तम धाडवाडकर, वंदना कोद्रे, डॉ. महादेव कोद्रे, प्रतिमा शेवाळे, छाया गदादे, सीमा शेंडे, स्नेषा घुले, विजयश्री भोसले.
शिवसेना (शिंदे गट) : अमर घुले, शक्ती प्रधान, विजय कामठे, विशाल ढोरे, अमित पवार,
निकिता गायकवाड, शैलेश पवार, तुषार मरळ, निकिता घुले, राजश्री माने.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : विक्रम शेवाळे, गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेल्हेकर, राजेश आरणे, अशोक शिंदे, मनीषा साळवे, प्रसाद कोद्रे, वैभव भंडारी, सविता जाधव, कुशल मोरे.
शिवसेना (ठाकरे गट) : सोमनाथ गायकवाड, दिलीप व्यवहारे, सूरज मोराळे, अमोल तुपे.
काँग्रेस : सारिका लांडगे, कृष्णकांत विभुते.
मनसे : कुलदीप यादव, राहुल मोरबाळे, भूपाल वाबळे, अनिल भांडवलकर.
आरपीआय : महादेव दंदी. आप : अनिकेत गागडे.