पुणे : प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झाल्यावर बाल विवाहाचा प्रकार उघड

पुणे : प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झाल्यावर बाल विवाहाचा प्रकार उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपली अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मुलीच्या आई-वडीलांवर आणि सासरच्यांवर लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीची नुकताच प्रसुती झाल्यानंतर समोर आला. ससूनच्या डॉक्टरांनी याबाबत फिर्यादी दिली आहे.

डॉ. अपेक्षा यशवंत करमनकर (28, रा. हॉस्टेल, ससून जनरल हॉस्पीटल) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी या ससून रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कर्तव्य करत असताना त्यांनी रूग्णालयात एका गरोदर महिलेची प्रसुती केली. तिच्यावर पुढील उपचार करण्याचे काम करत असताना संबंधीत महिला अल्पवयीन असताना तिचे लग्न करून दिल्याचे त्यांच्या लक्षात आली.

संशयीत आरोपी पतीपासून ती गर्भवती राहिल्याने तीची प्रसुती 14 मे रोजी झाली. तिच्या आई वडीलांनी व सासु सासर्‍यांनी बालविवाह करण्यास चालना दिल्यामुळे बालविवाहचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी याबाबत फिर्याद दिली. ऑगस्ट 2021 मध्ये मुलगी सज्ञान नसताना तिचा विवाह लावल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या आई-वडील, तिचा पती, सासू सासरे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमा नुसार तसेच बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news