काँग्रेस आगामी मनपा निवडणुकीत राबविणार एक परिवार, एक तिकीट धाेरण : नाना पटोले | पुढारी

काँग्रेस आगामी मनपा निवडणुकीत राबविणार एक परिवार, एक तिकीट धाेरण : नाना पटोले

 पुढारी ऑनलाईन डेस्क : 

कॉंग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्‍या वतीने एक परिवार, एक तिकीट धाेरण राबविण्‍यात येणार  आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष  नाना पटाेले यांनी आज माध्‍यमांशी बाेलताना दिली. माझा इतिहास हा एकदम स्पष्ट आहे. मी सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी लढणारा माणूस नाही. माझ्या राजकीय पार्श्वभूमीची चिंता करण्याची गरज नाही, असा अप्रत्‍यक्ष टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

यावेळी पटाेले म्‍हणाले, कॉंगेसने देशाला महासत्ता  बनवलं, सध्या देशातील परिस्थिती पाहता देशाची वाटचाल ही रशियाच्या  दिशेने सुरु आहे. लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला की नाही माहीत नाही; पण प्रत्येकाला लोकशाहीत स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे.

सत्तेसाठी भाजपाकडून धर्माचे बाजारीकरण – नाना पटोले

गेल्या ८ वर्षांमध्‍ये भाजपने देशाला ५० वर्षे  मागे नेले आहे.  देशात देशात गरिबी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. पण धर्माच राकारण केले जात आहे. सत्तेसाठी भाजपाकडून धर्माच बाजारीकरण केले जात आहे. भाजपाने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. निवडणूका जिंकण्यासाठी धर्माचा वापर करत आहे, असेही ते म्‍हणाले.

सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबरपासून देशभरात जनजागृती मोहीम राबविण्‍यात येणार आहे. यातून देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार आहोत. कॉंग्रस हा एक विचार आहे. कॉंग्रेसपक्षाने कधीच सत्तेचा गैरवापर केला नाही, असेही त्‍यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button