व्लादिमीर पुतीन ब्लड कॅन्सरने गंभीर आजारी, ते काही दिवसांचे सोबती, ऑडिओ टेप लीक! | पुढारी

व्लादिमीर पुतीन ब्लड कॅन्सरने गंभीर आजारी, ते काही दिवसांचे सोबती, ऑडिओ टेप लीक!

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ब्लड कॅन्सरने गंभीर आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू लाईन्स या अमेरिकेच्या मॅगझिनने मिळवलेल्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पुतीन ब्लॅड कॅन्सरने खूप आजारी आहेत आणि ते काही दिवसांचे सोबती आहेत.”

बिझनेस मॅगझिन न्यूज लाइन्सने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये पुतीन गंभीर असल्याचे म्हटले आहे. मॅगझिनने रशियाचे एक अब्जाधीश आणि एका उद्योजकाचे संभाषण रेकॉर्ड केले असल्याचा दावा केला आहे. रशियाचे उद्योगपती सांगतात की पुतीन गंभीररित्या आजारी आहेत. त्यांच्या अहंकारामुळे त्यांनी रशिया, युक्रेन आणि इतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. पुतीन यांच्यामुळे जगाला अडचणींचा सामना करावा लागत आहे हे सत्य आहे.

या टेपमध्ये रशियन अब्जाधीशाने दावा केला आहे की युद्धात १५ हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. त्यांच्या मते, पुतीन युक्रेन विरोधातील युद्ध जिंकले तरी आजाराविरुद्धचे युद्ध जिंकू शकणार नाहीत. जर ते जिंकले तर त्यांना सत्तांतरणाला तोंड द्यावे लागू शकते.
या टेपमध्ये रशियन उद्योजकाचा आवाज ओळखल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या टेपमध्ये दोघांमध्ये ११ मिनिटांचे संभाषण आहे. याआधी युक्रेनच्या गुप्तहेर यंत्रणेनेही पुतीन यांच्या आजारपणाची माहिती दिली होती. त्यांनी पुतीन यांना कॅन्सर झाल्याचे म्हटले होते.

एका अहवालात दावा करण्यात आला आहे की मॉस्कोच्या सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमधील सर्जन येवगेनी सेलिवानोव्ह यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या घराला ३५ वेळा भेट दिली आहे. सेलिवानोव्ह कर्करोगावरील तज्ज्ञ मानले जातात.

हे ही वाचा :

Back to top button