‘पवार-मोदी भेटीत राजकीय घडामोडी नाहीत’ | पुढारी

‘पवार-मोदी भेटीत राजकीय घडामोडी नाहीत’

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा: : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कोणत्याही राजकीय घडामोडी नसून नवीन सहकार खाते, लसीकरण आणि चीन सीमावाद यावरच चर्चा झाली.

त्यामुळे वेगळे काहीतरी घडणार अशी अपेक्षा ठेवू नये, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अधिक वाचा:

यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘पवार यांनी सकाळी पंतप्रधानांची भेट घेतल्यावर खळबळ उडण्याचे फारसे कारण नाही. नव्या सहकार मंत्रालयाबाबत त्यांची विस्तृत चर्चा झाली. देशभरामध्ये लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अधिक वाचा:

चीनच्या सीमेवर सुरू असलेला वादाबाबतही त्यांनी चर्चा केली आहे. यामुळे नव्या राजकीय घडामोडीचे कोणतेच संकेत नाहीत. या भेटीने विविध चर्चांना ऊत आला असला तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणतीच अडचण नाही.

पंतप्रधानांना विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटणे हे चांगलेच आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा:

‘आघाडी सरकारला चंद्रकांतदादांचे सर्टीफिकेटच’

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार पाच वर्षे टिकणार असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत मुश्रीफ यांनी हे तर महाविकास आघाडीला सर्टिफिकेटच आहे, असे म्हटले.

‘महाविकास आघाडीतील सर्वच नेते हुशार असून एकमेकांवर आरोप करतील, भांडतील पण सरकार पाडणार नाहीत,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: चला पाहूया नाशिकचा किल्ला

Back to top button