दगडी चाळीच्या भिंतीवर अरुण गवळी चे ‘पदवी’ सर्टिफिकेट! | पुढारी

दगडी चाळीच्या भिंतीवर अरुण गवळी चे ‘पदवी’ सर्टिफिकेट!

नागपूर, पुढारी ऑनलाईन: दहशतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील अरुण गवळी याच्या दगडी चाळीच्या भिंतीवर आता ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेट टांगले जाणार आहे.

डॉन अरुण गवळी सध्या तुरुंगाची हवा खात असून तेथे त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तो बीएच्या अंतिम वर्षात आहे. तो तीन पेपर उतीर्णही झाला आहे.

अधिक वाचा: 

दगडी चाळ म्हटले की डॉन अरुण गवळीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या दहशतीच्या अनेक कुकथा मुबंईत प्रसिद्ध आहेत.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी सध्या तो तुरुंगात आहे.

अधिक वाचा: 

घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने लहानपणी त्याला शाळा सोडावी लागली होती. वडिलांना मदत व्हावी म्हणून अरूण गवळी सुरूवातीला दूध विकण्याचे काम करत होता. कालांतराने तो गुन्हेगारी विश्वाकडे ओढला गेला.

अनेक खून आणि हल्ल्यांचे त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.

अधिक वाचा: 

सध्या तो शिवसेना नगरसेवकाच्या खूनप्रकरणी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तेथे त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. सध्या तो बी. ए. च्या अंतिम वर्षांत आहे.

तीन पेपरमध्ये तो उतीर्ण झाला असून दोन पेपर दिल्यास त्याला बी.ए. ची पदवी मिळणार आहे.

मन लावून अभ्यास

‘अरुण गवळी जेलमध्ये मन लावून अभ्यास करीत आहे. अभ्यासात त्याला काही अडचणी आल्यास तो एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे विचारतो,’ अशी माहिती इग्नूचे डायरेक्टर पी. शिवस्वरुप यांनी दिली.

यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये अरुण गवळीने गांधी विचार मंचच्या परीक्षेत टॉप केले होते. त्यावेळी त्याने ८० पैकी ७४ गुण मिळवले होते.

हेही वाचले का: 

 

 

Back to top button