ग्रंथालयांची लाखोंची पुस्तक खरेदी आली हजारांवर | पुढारी

ग्रंथालयांची लाखोंची पुस्तक खरेदी आली हजारांवर

पुणे : सुवर्णा चव्हाण : कोरोनामुळे शहरातील ग्रंथालये आर्थिक अडचणीत सापडली असली, तरी ग्रंथालयांकडून दरवर्षी होणारी नवीन पुस्तकांची खरेदी काही प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प असून, दरवर्षी होणार्‍या एक ते सहा लाखांच्या पुस्तक खरेदीत कपात करून काहींनी फक्त 30 ते 50 हजार रुपयांची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आणि अनुदान रखडल्यामुळे ग्रंथालयांकडून पुस्तक खरेदी झाली नव्हती. परंतु, आता अनुदानातील काही भाग मिळाल्यामुळे ग्रंथालयांनी पुस्तक खरेदी सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने ती केली जात आहे. आताही ग्रंथालयांसमोरील आर्थिक प्रश्न सुटलेला नाही.

CDS post : ‘नवे सीडीएस’ म्हणून लष्कर प्रमुख मराठमोळे मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर

दरवर्षी ग्रंथालयांकडून नवीन पुस्तके विकत घेतली जातात. वाचकांना आवडणारी आणि भावणारी नवीन पुस्तके ग्रंथालयांचा भाग बनतात. या पुस्तकांची निवड ग्रंथालयातील निवड समितीमार्फत होते. सुमारे एक ते अडीच लाखांची पुस्तके ग्रंथालयांकडून घेतली जातात. नवीन पुस्तक खरेदी हा ग्रंथालयातील महत्त्वाचा भाग असतो. कोरोनामुळे मागील वर्षी पुस्तक खरेदी रखडली. मात्र, सध्याच्या घडीला ती टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. प्रकाशन संस्था, वितरक आणि पुस्तक दालनांमधून हळूहळू पुस्तक खरेदी केली जात आहे.

बिपीन रावत स्टाफ : ब्रिगेडिअर प्रमोशनच्या रांगेत होते, तर लेफ्टनंट कर्नल सियाचीनसाठी झुंजले !

अनुदान वेळेत मिळावे

याविषयी पुणे मराठी ग्रंथालयाचे उपकार्याध्यक्ष शरद घाणेकर म्हणाले, “मागच्या वर्षीपासून शासकीय अनुदान मिळण्यात सातत्य नसल्याने नवीन पुस्तकांची खरेदी करणे शक्य झाले नाही. आताही हीच स्थिती आहे. पण, तरीही काही प्रमाणात पुस्तक खरेदी केली आहे. त्याचे प्रमाण अल्प असून, आर्थिक अडचणींमुळे आम्ही मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करू शकलेलो नाही. आम्ही दरवर्षी पाच ते सहा लाखांची नवीन पुस्तके खरेदी करतो. 500 ते 800 नवीन पुस्तके खरेदी केली जातात. वर्षभर पुस्तक खरेदी सुरूच असते.
गेल्या वर्षीपासून नवीन पुस्तकांच्या खरेदीत सातत्य राहिलेले नाही. पुस्तकांची खरेदी थोडी-बहुत सुरू आहे. अनुदान वेळेवर मिळाले, तर नवीन पुस्तकांच्या खरेदीची अडचण दूर होईल.”

बिपीन रावत यांची त्यांच्या मूळ गावी घर बांधण्याची इच्छा राहिली अपुरी!

दोन वर्षांनंतर पुस्तक खरेदी

सिद्धार्थ वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले म्हणाले, “अनुदानाच्या भरवशावर ग्रंथालयासाठी नवीन पुस्तके खरेदी केली जातात. ग्रंथालयांच्या संग्रहात नवीन पुस्तकांची भर पडणे खूप महत्त्वाचे असते. आम्ही प्रत्येक वर्षी एक लाख 8 हजार रुपयांची पुस्तके विकत घेतो. पण, मागील वर्षी कोरोनामुळे आणि अनुदानात सातत्य नसल्याने पुस्तक खरेदी झाली नाही. आता हळूहळू पुस्तक खरेदीला सुरुवात केली आहे. अनुदानाचा नियमित येणारा पहिला हप्ता जमा झाल्याने पुस्तक खरेदी करता आली. साधारणपणे 30 ते 40 हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली आहेत. त्यात सातत्य राहावे, असे वाटते.”

Bipin Rawat : कोल्हापूर ही वीरभूमी : बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा

‘‘अनुदानाचा प्रश्न ग्रंथालयांसमोर होता आणि आताही आहे. अपुर्‍या अनुदानामुळे ग्रंथालयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परंतु, आता ग्रंथालयांकडून नवीन पुस्तक खरेदी सुरू झाली आहे. आम्हीही सुमारे 65 हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली आहेत. साधरणपणे 500 पुस्तके खरेदी केली आहेत. नवीन पुस्तके खरेदी करणे गरजेचे असते, म्हणूनच आम्ही नेहमी नवीन पुस्तक खरेदीवर भर देतो. अनुदानाच्या रकमेतून ती खरेदी केली जातात. त्यामुळे सरकारने ग्रंथालयांच्या अडचणी समजून घेऊन वेळेवर अनुदान द्यावे.’’

                                                                                   – राजेंद्र सुतार, मानद सचिव, राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय

हेही वाचा

पुण्यातील गल्लीबोळात बोकाळलीय अवैध सावकारी

पुणे : खराडीत बीआरटी स्टॉपला कारची धडक : दोन ठार; दोन जखमी

सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम दोन महिने लांबणार

बीअर शॉपीचालकांच्या तोंडाला ‘फेस’

पिंपरी : एक कोटी 10 लाख रुपये किमतीची उलटी

‘डायव्हर्जन अॅन्ड रूल’ हाच केंद्र सरकारचा फंडा : कन्हैया कुमार

 

Back to top button