मनुर खून प्रकरण : गोळ्या झाडण्याचा सराव त्यांनी केला जंगलात | पुढारी

मनुर खून प्रकरण : गोळ्या झाडण्याचा सराव त्यांनी केला जंगलात

  • दोन महिन्यांपूर्वी रचला होता कट

  • तिघांना आठ तासांतच बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या पदाधिकार्‍याचा खून करण्याचा कट दोन महिन्यांपूर्वीच शिजल्याचे व पिस्तूल मिळाल्यानंतर गोळ्या झाडण्याचा सराव एका जंगलात केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील मास्टर माइंडसह तिघांना आठ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

मुख्य संशयित आरोपी मेहबूब बलुरगी (33, रा. जनता वसाहत, पर्वती, मार्केट यार्ड), सुफियान फैयाज चौरी (19, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) आणि नीलेश सुनील कुंभार (30, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनुर (32, रा. अरमान हाऊस, काळुबाईनगर, फालेनगर, आंबेगाव बुद्रुक) यांचा खून करण्यात आला होता.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना साने गुरुजी वाचनालयाचा दाभोलकर पुरस्कार

सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समीर हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चंद्रभागा हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी गेले असता दुचाकीवर आलेल्या संशयित आरोपींनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात सहा गोळ्या लागून समीर जागीच ठार झाले. गुन्ह्याचा शोध घेत असताना खून करणारा मुख्य आरोपी मेहबूब जनता वसाहत परिसरात लपून बसल्याची माहिती तपास पथकातील अंमलदार राहुल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्याला लागलीच ताब्यात घेतले. त्याचे दोन साथीदार कोरेगाव पार्क परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चौरी आणि कुंभारसह आणखी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

कॅटरिना-विकी कौशलच्या लग्नात ‘विघ्न’?; कोर्टात ‘या’ कारणासाठी याचिका दाखल

चौकशीत आरोपींनी पैशाच्या व्यवहारातूनच खून केल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अंमलदार रवींद्र भोसले, हर्षल शिंदे, गणेश सुतार, आशिष गायकवाड, गणेश शेंडे, राहुल तांबे, सचिन गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोटरसायकल चोरीचा आरोप : पोलिसांसमोर मुलाच्या बापाने सोडला प्राण

पैशाच्या कारणातूनच खून

संशयित आरोपी मेहबूब याला समीर हे पैसे देणे लागत होते. परंतु, समीर हे पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करीत होते. यापूर्वी समीर यांनी देखील मेहबूब याला मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून मेहबूब याने पिस्तूल खरेदी केले होते. त्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव त्यांनी पुण्यातील एका जंगलात केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

हेही वाचा

Anti BJP front : विरोधकांच्या आघाडीचे राहुल गांधी यांनी नेतृत्व करावे : संजय राऊत

नारायणगावनजीक अपघात; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी

ICMR आणि NIVची नवी कोरोना टेस्ट : रिपाेर्ट मिळणार 30 मिनिटांत

ब्रेकिंग- RBI Monetary Policy : रेपो दरात कोणताही बदल नाही

‘चारमधील तीन शब्द उर्दू’; योगी सरकार ला जावेद अख्तर यांचा टोला

 

Back to top button