‘चारमधील तीन शब्द उर्दू’; योगी सरकार ला जावेद अख्तर यांचा टोला | पुढारी

‘चारमधील तीन शब्द उर्दू’; योगी सरकार ला जावेद अख्तर यांचा टोला

मुंबई, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश निवडणुकांची भाजप जोरात तयारी करत असून त्यासाठी तयार केलेल्या स्लोगनवरून गीतकार जावेद अख्तर यांनी  योगी सरकार ला टोला हाणला आहे. योगी सरकारने तयार केलेल्या स्लोगनमधील चार शब्दांतील तीन शब्द उर्दू आहेत असे म्हणत चिमटा काढला आहे.

जावेद अख्तर यांचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत असून त्यावर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपाने ऑनलाइन प्रचार सुरू केला होता. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचे आणि सुशासनाचे महत्त्व सांगताना तयार केलेल्या घोषवाक्यावरून आता अख्तर यांनी चिमटा काढला आहे. ‘सोच ईमानदार काम दमदार’ या चार शब्दांतील ईमानदार, काम आणि दमदार हे तीन शब्द उर्दू आहेत, असे अख्तर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

योगी सरकार ला जावेद अख्तर यांचा टोला : यूजसर्सच्या समिश्र प्रतिक्रिया

यावर काही यूजर्सनी योगी सरकारची खिल्ली उडविली तर काहींनी त्याचे समर्थन केले आहे. ‘हिंदीप्रमाणे उर्दू देखील भारताची आहे.’ तर, काहींनी म्हटलं की, ‘सरकार हिंदी आणि उर्दूमध्ये फरक करत नाही, परंतु काही लोक दोन्ही भाषांना विभाजित करतात.’ असे काही यूजर्सनी म्हटले आहे.

 

हेही वाचा: 

Back to top button