कॅटरिना-विकी कौशलच्या लग्नात ‘विघ्न’?; कोर्टात ‘या’ कारणासाठी याचिका दाखल | पुढारी

कॅटरिना-विकी कौशलच्या लग्नात ‘विघ्न’?; कोर्टात ‘या’ कारणासाठी याचिका दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सिनेअभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न सध्या मीडियात चर्चेचा विषय असून आता आणखी एका कारणाने ते पुन्हा चर्चेत आले आहे.

सवाई माधोपूर येथील एका लहानशा बरवाडा या गावातील चौथे माता मंदिर अचानक चर्चेत आले आहे. या लग्नासाठी मंदिराकडे जाण्याचा रस्ता अडविल्याने ॲड. नेत्रविंद सिंग जादोन यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सध्या कॅट आणि विकी कौशल यांच्या लग्नासाठी सवाई माधोपूर पॅलेसमधील सिक्स सेंन्स हॉटेल सजले आहे. या लग्नाची प्रचंड चर्चा आहे.

या हॉटेलजवळच जवळपास ७०० वर्षांपूर्वीचे चौथे माता मंदिर आहे. लग्नानंतर कॅट आणि विकी कौशल येथे दर्शनासाठी जाणार आहेत, असे सांगितले जात आहे. या मंदिराला ७०० पायऱ्या आहेत. मात्र, या लग्नासाठी हॉटेलचा परिसर सील करण्यात आला आहे.

चौथे माता मंदिर मीणा आणि कंजर समाजाची कुलदैवत आहे. संपूर्ण देशात हे एकमेव मंदिर असून मंदिरात जाण्यासाठी ७०० पायऱ्या चढाव्या लगातात. या सगळ्या पायऱ्या खड्या आहेत. अशी अख्यायिका आहे की, देवीने दर्शनाला बोलविले की माणसांत हिंमत येते आणि दर्शन होते. दर्शन घेणाऱ्या लोकांना जे मागेल ते मिळते अशी धारणा आहे.

या मंदिरात देवीबरोबर गणपती मूर्ती आणि भैरवाचे लहान मंदिरही आहे. करवा चौथ करणाऱ्या महिला या मंदिरात येऊन आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी साकडे घालतात. येथे दर्शन घेतल्याने पती आणि कुटुंबावर कुठलेही संकट येत नाही असे म्हणणे आहे.
मात्र, या मंदिराकडे जाणारे रस्ते लग्नासाठी बंद केल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.

शिवाय लग्नानंतर विकी कौशल आणि कॅटरिना या मंदिरात जाणार की नाही याबाबत स्पष्टता नसतानाही हे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नेत्रविंद सिंग जादौन यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे. या लग्नासाठी भाविकांना मंदिरात जाण्यापासून रोखू नये, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button