पुणे : पोटचारीला धडकून कार खाली कोसळली; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी | पुढारी

पुणे : पोटचारीला धडकून कार खाली कोसळली; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल राज वैभवजवळ बुधवारी (दि. ८) पहाटे ६ वाजेच्या दरम्यान संगमनेरहून नारायणगाव ओलांडून पुण्याच्या दिशेला निघालेली मारुती वॅगनआर गाडी पोटचारीवरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणगाव येथील भोसले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना साने गुरुजी वाचनालयाचा दाभोलकर पुरस्कार

सकाळी धुके असल्याने गाडी चालकाला पुलाचा कठडा दिसून न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकुळ जाधव, (वय २० ते २३ वर्ष, रा. वाकड पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

राज्यात पहिला डोस पूर्णत्वाच्या दिशेने

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण संगमनेरहून पुण्याच्या दिशेला निघाले होते. नारायणगाव ओलांडून पुढे पुण्याच्या दिशेला जाताना हॉटेल राज वैभव जवळ असणाऱ्या पोट चारीच्या पुलाला धडकून वॅगनआर (एमएच १४ जेई १२९) गाडी पुलाखाली कोसळली. या अपघातात मारुती गाडीचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.

हेही वाचा

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस अखेर ईडी कार्यालयात दाखल

Anti BJP front : विरोधकांच्या आघाडीचे राहुल गांधी यांनी नेतृत्व करावे : संजय राऊत

‘चारमधील तीन शब्द उर्दू’; योगी सरकार ला जावेद अख्तर यांचा टोला

ब्रेकिंग- RBI Monetary Policy : रेपो दरात कोणताही बदल नाही

अभियांत्रिकी प्रवेशासाठी तीन दिवसांची मुदतवाढ

नोकरी सोडली अन् पगारावर 18 टक्के ‘जीएसटी’चा भुर्दंड!

 

Back to top button