Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस अखेर ईडी कार्यालयात दाखल | पुढारी

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस अखेर ईडी कार्यालयात दाखल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणाच्या चौकशीसाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले होते. दरम्यान, आज बुधवारी (दि.८) जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाली. जॅकलीनच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तसेच त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र तब्बल सात हजार पानी आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या चौकशीत आढळून आले आहे. या प्रकरणात जॅकलीनची चौकशी केली जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन (Jacqueline Fernandez) हिला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि चार मांजरं भेट म्हणून दिली होती. या मांजरांची किंमत प्रत्येकी ९ लाख रुपये एवढी आहे. तसेच त्याने महागडे दागिने आणि महागड्या भेटवस्तू जॅकलीनला दिल्या आहेत, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीनला ईडीने समन्स बजावले होते. याआधी तीनवेळा जॅकलिनने ईडीच्या चौकशीला दांडी मारली होती. पण आज अखेर ती ईडी कार्यालयात दाखल झाली.

मनी लाँडरिंग प्रकरणी जॅकलीन विरुद्ध ईडीने लूकआऊट नोटीसदेखील काढली होती. विदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. नंतर तिची सुटका केली होती.

हे ही वाचा :

 

Back to top button