अवकाळी पाऊस शेतकर्‍यांच्या मानगुटीवर | पुढारी

अवकाळी पाऊस शेतकर्‍यांच्या मानगुटीवर

पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे : 

परिसरात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण आहे. पावसाने रब्बी पिकासह बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी हरभरा, वाटाणा, मसूर आदी पेरणी झालेल्या पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्गात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फक्त सर्व्हिस रस्ता नको; ‘दिंडी मार्ग’च हवा !

इंद्रायणी, पवना या नदीकाठी असलेली बागायती पिके, भाजीपाला पिकांना दिवसभर पडणार्‍या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

मुसळधार पावसाने शेतात पाणी साचू लागल्याने पेरलेली रब्बी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर ही पिके कुजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यांगासाठी नाहीत डिसेबल फ्रेंडली अ‍ॅप्लिकेशन

यावर्षी रब्बी पिके पेरणीपूर्वी मान्सूनच्या पावसाने असा जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर लांबणीवर पडल्या होत्या.

या जोरदार पावसाने तालुक्यात कडाक्याची थंडी पडली असून, मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे शेतकरी आणि जनावरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन ठरेल प्रभावी !

तीन-चार दिवस सलग पडत असलेल्या पावसामुळे बागायती पिकांच्या भाज्यांच्या काढण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर, भाजीपाला महाग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तसेच, दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे शेतामध्ये जाऊन पीक काढणी करणे शक्य नसल्याने काढणीदेखील लांबणीवर पडत आहे.

Back to top button