ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन ठरेल प्रभावी ; ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांना विश्वास ! | पुढारी

ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन ठरेल प्रभावी ; 'आयसीएमआर'च्या शास्त्रज्ञांना विश्वास !

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

जगभरात कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे धोका वाढत आहे. दरम्यान अनेक लस उत्पादक कंपन्यांनी या व्हेरियंटच्या विरोधात लसीच्या प्रभावशीलतेसंबंधी साशंकता दर्शवली आहे.

पंरतु, भारतात बनवण्यात आलेल्या कॉव्हॅक्सिन संबंधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तज्ज्ञांनी विश्वास दर्शवला आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटच्या रूपाचा सामना करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इनॲक्टीव्हेटेड व्हायरसच्या तंत्रावर अधारित हि लस बनवण्यात आली असल्याने कोव्हॅक्सिनचा डोस उर्वरित लशींच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरू शकते. संपूर्ण संसर्गालाच निष्क्रियच करीत असल्याने ही लस नवीन व्हेरियंटवर प्रभावी ठरू शकते, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरियंटविरोधात देखील कोव्हॅक्सिन प्रभावी आढळून आली आहे. अशात इतर व्हेरियंट विरोधात देखील तेवढेचे प्रभावी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पंरतु, लस घेतलेल्या नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. या नवीन व्हेरियंट विरोधात लसीची प्रभावशीलतेचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी तपासण्या केल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button