Breaking ! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी.. | पुढारी

Breaking ! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी..

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. शरद पवार, अजित पवार या बड्या नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच एक मोठा ट्विस्ट बारामतीत बघायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या आहेत. अजित पवारांची आई काटेवाडीत असुन त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे काटेवाडीत गेल्या आहेत.

या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठच वळण पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळेंनी मतदान केलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपला मोर्चा थेट काटेवाडीकडे अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले असुन सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

हेही वाचा

Back to top button