LokSabha Elections | दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर; या लोकसभा मतदारसंघांचा समावेश | पुढारी

LokSabha Elections | दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर; या लोकसभा मतदारसंघांचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतुदीनुसार मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यांत होणार असून, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 3 मे रोजी, दुसरी 7 मे रोजी, तर तिसरी तपासणी 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक 3, चौथा मजला, बी विंग, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 2 मे रोजी, दुसरी तपासणी 6 मे आणि तिसरी तपासणी 10 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे, असे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. खर्च तपासणी सभागृह क्रमांक 3, चौथा मजला, बी विंग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 3 मे रोजी, दुसरी तपासणी 7 मे आणि तिसरी तपासणी 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा

Back to top button