crocodile : इंदापूर तालुक्यातील भीमा नदी काठच्या भावडी गावात आढळली मगर | पुढारी

crocodile : इंदापूर तालुक्यातील भीमा नदी काठच्या भावडी गावात आढळली मगर

इंदापूर/वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी काठच्या भावडी गावातील नितीन महादेव शिपकुले यांच्या गट क्र. २२७ मधील विहिरीत मगर (crocodile) आढळून आली. यामुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिक भयभीत झाले आहेत.

शेतकरी नितीन शिपकुले यांनी सांगितले की, तीन महिन्यापूर्वी आम्हाला मगरीसारखा प्राणी विहिरीत दिसला होता. बुधवारी १ डिसेंबरला याच विहिरीतील गाळ काढण्यासाठी पोकलेन मशिन आणले होते. विहिरीत मशीनने काम सुरू करण्याच्या अगोदरच मगर दिसून आली. याची माहिती आम्ही तातडीने वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, विहिरीत पाणी असल्यामुळे व विहिरीतील कपारीचा आधार घेऊन ती बसत असावी. यामुळे तातडीने विद्युत मोटार व इंजिनाच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम वेगात सुरू आहे. पुण्याहून पथक रवाना झाले आहे. दरम्यान याबाबत वन विभागाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Back to top button